उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्याचा ५९ वा स्थापन दिवस उस्मानाबादमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर संचलन करण्यात आले. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित असलेल्या नागरिकांना तसेच स्वातंत्र सैनिकांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे पालकमंत्र्यांनी शुभेच्छा देत भाषण करण्याचे टाळले.