उस्मानाबाद - लोकसभा मतदारसंघामधील मतदानाची तयारी आज( बुधवारी) पूर्ण करण्यात आली. ईव्हीएम मशीन आणि मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी गावोगावी रवाना झाले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ११७ मतदान केंद्रे आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जवळपास २ हजार २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबरच संवेदनशील बुथसाठी सीआरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी उस्मानाबाद येथे दाखल झाली आहे. ज्यामध्ये ८५० पोलीस कर्मचारी हे बाहेरून मागवण्यात आले आहेत.
उस्मानाबादमध्ये तिरंगी लढत होत असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये ही लढत होणार आहे.