उस्मानाबाद - दुष्काळामुळे मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आदेश देऊन दुष्काळाची पाहणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या दुष्काळी दौऱ्याचे आज आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथून पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरवात झाली. येथील सामाजिक वनीकरण व मनरेगा अंतर्गत जोपासण्यात आलेल्या नर्सरीची पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री खोतकर हे भूम तालुक्यातील हाडोंग्री या गावातील भगवंत बहुउद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या चारा छावणीस भेट दिली. त्याचबरोबर येथिल जनावरांची संख्या दररोजचा मिळणाऱ्या जनावरांचा चारा अशी माहिती घेत येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.