ETV Bharat / state

तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी रुपात अलंकार महापूजा - तुळजापूर नवरात्रोत्सव

शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या माळेनिमित्त (दुर्गाष्टमी) तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा मांडण्यात आली. दुर्गा सप्तसतीचा पाठकरुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा तुळजापूर येथे आहे.

महिषासुरमर्दिनी रूपात तुळजाभवानी
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:57 PM IST

उस्मानाबाद - शारदीय नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या माळेनिमित्त (दुर्गाष्टमी) तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा मांडण्यात आली. महिषासूरमर्दिनीचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनीरूपात महापूजा

महिषासुराने देवतांना हाकलून दिल्यानंतर देवी पार्वतीचा अवतार असलेल्या तुळजाभवानी देवीने दैत्यराज महिषासुराचा वध केला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालून महिषासुर मर्दिनी रूपात महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.

हेही वाचा - गोंदियात 'या' एकाच ठिकाणी सर्व समाजातील स्त्रियांसाठी आयोजित होतो रास गरबा

तुळजाभवानी मंदिरात वैदिक होमाचा कार्यक्रम झाला. दुर्गा सप्तसतीचा पाठकरुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, तहसीलदार योगिता कोल्हे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:तुळजाभवानीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा

शारदीय नवरात्र महोत्सवा दुर्गाष्टमी म्हणजे शेवटच्या माळे दिवशी श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. महिषासूराचे रुप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला.त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते.
वैदिक होम व हवनास विधीवत पुर्णाहुती शारदीय नवरात्र महोत्सवात आज रविवारी श्री तुळजाभवानी मंदीरात वैदिक होम व हवन कार्यक्रम झाला. सप्तसतीचा पाठ करुन अष्टमीच्या दिवशी मुख्य होमावर पूर्णाहूती देण्याची प्रथा आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व विधीवत पूजेनंतर या होमास पूर्णाहुती देण्यात आली. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे,याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.