ETV Bharat / state

Kalamb Railway : कळंब रोडला रेल्वे थांबा द्या, अन्यथा अन्नत्याग आंदोलन - Give railway stop to Kalamba Road

कसबे तडवळे येथील कळंब रोडला रेल्वे थांबा द्या, ( Demand to stop train on Kalamb road ) अन्यथा अन्नत्याग आंदोलन ( Food Abstinence Movement ) करण्यात येइल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रेल्वे प्रशासनाची अनास्था असल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन ( Food boycott movement against railway administration ) करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडप्पा कोरे यांनी दिली.

Kalamb Railway
Kalamb Railway
author img

By

Published : Nov 20, 2022, 8:03 PM IST

उस्मानाबाद - डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या पदस्पर्श लागलेल्या कसबे तडवळे येथील कळंब रोडला रेल्वे थांबा देण्यासाठी अन्यथा अन्नत्याग ( Food Abstinence Movemen ) आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रेल्वे प्रशासनाची अनास्था असल्याने गावातील ग्रामस्थांकडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात अन्नत्याग ( Food boycott movement against railway administration ) आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडप्पा कोरे यांनी दिली. ते कळंब रोड स्टेशन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

कळंब रोडला रेल्वे थांबा द्या, अन्यथा अन्नत्याग आंदोलन

मनमानी कारभार - 23 फेब्रुवारी 1941 ला मराठवाड्यातील पहिली महार, मांग वतन परिषद कसबे तडवळे या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. त्यावेळी नॅरोगेज रेल्वेने आंबेडकर या ठिकाणी पोहचले होते. पुढे या नॅरोगेजचे ब्रॅडगेज करण्यात आले. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी नॅरोगेज रेल्वेला जे थांबे होते तेच थांबे ब्रॉडगेज रेल्वेला कायमस्वरूपी ठेवावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत या रेल्वेस्थानकाला त्यातून कशासाठी वगळले आहे? असा सवाल कोरे यांनी उपस्थित केलाय.

प्रश्नाकडे फिरविली पाठ - जिल्ह्याचे लोकसभेत नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन खा.कल्पना नरहिरे, खा.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडे वारंवार मागणी केली. तर विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे देखील याबाबत लोकसभेत आवाज उठवावा अशी मागणी केली. परंतू त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. करण लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे डोळे झाकून पाठ फिरविली असल्याचा गंभीर आरोप देखील कोरे यांनी केला.

अन्नत्याग आंदोलन - प्रशासनाने एक महिन्यापर्यंत हा थांबा सुरू करावा अन्यथा, अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी तानाजी जमाले, गणेश करंजकर, अजिंक्य भालेराव, तुळशीदास जमाले, तानाजी भालेराव, प्रा. मारुती कारकर, तेजस भालेराव, संजय वाघ, अरुण पाटील, नानासाहेब वाघ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.