उस्मानाबाद - स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज(8 नोव्हेंबर) तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ, माळुंब्रा,आपसिंगा, कात्री कामटा गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - पंचनाम्याच्या प्रश्नांना वैतागून शेतकऱ्याने जाळली सोयाबीनची गंजी; जिंतूर तालुक्यातील प्रकार
राजू शेट्टी यांनी थेट बांधावर जाऊन द्राक्ष,सोयाबीन,केळी, कांदा या पिकांची पाहणी केली. अनेक गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतीची अवस्था पाहून शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि विमा कंपन्यांनी सरसकट विमा द्यावा, या प्रमुख मागण्या आपण मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. असे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, धनाजी पेंदे, राजेंद्र हाके, गुरुदास भोजने, नेताजी जमदाडे,अनिल धनके, शहाजी शहापूरे, प्रसाद सातपुते, आदी उपस्थित होते.