उस्मानाबाद - कडक उन्हाळ्यानंतर काल पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काहीं प्रमाणात उष्णतेपासून आराम भेटला यातच रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे चारा छावणीचे नुकसान झाले आहे.
चालू वर्षी दुष्काळाची भीषणता मोठी असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी या गावात सुरु असलेल्या चारा छावणीला या पावसाचा फटका बसलाय.
रात्री झालेल्या पावसामुळे चारा छावणीसाठी जनावरांना सावली मिळावी म्हणून ग्रीन शेडनेटपासून तात्पुरते शेड उभारले होते. या चारा छावणीत जवळपास ५०० लहान-मोठे जनावरे आहेत. हे शेड संपूर्णपणे फाटले आहे जनावरांसाठी जमा केलेला चारा भिजून नुकसान झाले. यामुळे आता जनावरांना काय खाऊ घालावे हा प्रश्न चारा छावणी मालकापुढे आहे.