ETV Bharat / state

कोरोना अफवेची राज्यातील पहिली तक्रार उस्मानाबामध्ये दाखल - romour about corona

कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात आढळून आल्याच्या अफवा उस्मानाबमध्ये पसरल्या होत्या. या अफवांमुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून अशी अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

कोरोना अफवेची राज्यातील पहिली तक्रार उस्मानाबामध्ये दाखल

author img

By

Published : Mar 10, 2020, 10:53 PM IST

उस्मानाबाद - चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची धास्ती भारतीयांनीही घेतली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. एक संशयित रुग्ण उस्मानाबादेतील जिल्हा रुग्णालयामध्ये आढळल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात असून त्यामुळे उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोना अफवेची राज्यातील पहिली तक्रार उस्मानाबामध्ये दाखल

कोरोना विषाणूचे रुग्ण भारतातही आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडत आहे. अशातच कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्याच्या अफवा उस्मानाबमध्येही पसरल्या. या अफवांमुळेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात रितसर तक्रार दिली आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : अफवेने पोल्ट्री व्यवसायावर संकट

पुण्यात कोरोना विषाणूचे ५ रुग्ण सापडले आहेत. त्यातच २ दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याची बातमी समाजमाध्यमांवर पसरली होती. त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ती निव्वळ अफवा असल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.