उस्मानाबाद - कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी गेली तीन वर्षे शेतकरी लढा देत आहेत. मात्र, शासन या मागण्यांची दखल घेत नाही, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य पॉलिहाऊस शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. दुष्काळ, नापीकी, तापमानातील चढ-उतार, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे मागील पाच-सहा वर्षात राज्यातील शेडनेटची शेती तोट्यात आहे.
हेही वाचा - शिवसेना-भाजप युती तुटणार ?
पॉलिहाऊस शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतील चुकीच्या शासन धोरणांचा या शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याच बरोबर प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे कर्जमाफी सह अन्य समस्या सोडवण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आंदोलनामार्फत केली.