ETV Bharat / state

ऊसाच्या थकित बिलावरून शेतकऱ्यांचे साखर कारखान्याच्या चिमणीवर चढुन 'शोले स्टाईल' आंदोलन

author img

By

Published : Sep 13, 2019, 11:45 PM IST

जिल्ह्यातील शीला अतुल साखर कारखान्याने ६ महिन्यांपासून ऊस गाळपाचे पैसे दिले नसल्याने औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील शेतकऱ्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन केले. त्यानंतर कारखान्यातील काम बंद करून प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांचे थकित ऊस बिलापोटी कारखान्यावरती चढून आंदोलन

उस्मानाबाद - जिल्ह्यातील शीला अतुल साखर कारखान्याने ६ महिन्यांपासून ऊस गाळपाचे पैसे दिले नसल्याने औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील शेतकऱ्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन केले. त्यानंतर कारखान्यातील काम बंद करून प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस प्रशासनाने दखल देत शेतकऱ्यांना शांततेचा सल्ला दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील नितळी येथील 'शीला-अतुल साखर कारखाना' भाडेतत्वावर एका खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी देण्यात आला आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला, जानेवारी २०१९ मध्ये पदरमोड करून ऊसाचे गाळप केले. मात्र, तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले गेले नाहीत. याप्रकरणी नकुलेश्वर बोरगाव येथील १५ शेतकरी कारखाना स्थळावर आले. त्यांनी प्रथम प्रशासनाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अखेर त्यांनी आंदोलन सुरू केले.

शेतकऱ्यांचे थकित ऊस बिलापोटी कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन

हेही वाचा -प्रलंबित मागण्यांसाठी पॉलिहाऊस शेडनेट धारक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

या आंदोलनादरम्यान ६ ते ७ शेतकरी कारखान्याच्या १५० फूट उंच चिमणीवर जावून बसले होते, आणि पैसे दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. कारखाना प्रशासनाला याबाबतची माहिती मिळताच धावपळ करीत प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वीच उर्वरीत शेतकऱ्यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हा कर्मचारीही कारखान्याबाहेर जाऊ लागले. दरम्यान काही पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानी आंदोलनकर्त्यांची समजूत काढल्यानंतर हळूहळू चिमणीवर चढलेले शेतकरी खाली उतरले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासन तसेच सरकारच्या विरोधात 'हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही' म्हणत घोषणाबाजीही केली.

हेही वाचा - पेट्रोल पंपावर दरोडा; दोन लाखांची रोकड लंपास

Intro:शेतकऱ्यांचे थकित ऊस बिलापोटी कारखान्यावरती चढून आंदोलन

उस्मानाबाद - जिल्ह्यातील शिला अतुल साखर कारखान्याने सहा महिन्यापासून ऊस गाळपाचे पैसे दिले नसल्याने औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले. त्यानंतर कारखान्यातील काम बंद करून प्रशासनासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना शांततेचा सल्ला दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील नितळी येथील शिला-अतुल साखर कारखाना भाडेतत्वावर एका खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी दिला आहे. २०१८-१८ च्या गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांना कारखान्यास गाळपासाठी ऊस दिला. जानेवारी २०१९ मध्ये पदरमोड करून ऊसाचे गाळप केले. मात्र तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत. नकुलेश्वर बोरगाव येथील १५ शेतकरी कारखाना स्थळावर आले. त्यांनी प्रथम प्रशासनासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अखेर आंदोलन सुरू केले. सहा ते सात शेतकरी कारखान्याच्या चिमणीवर जावून सुमारे १५० फूट उंचीवर जावून बसले. पैसे दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचे भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान कारखाना प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली. धावपळ करीत प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यापूर्वीच उर्वरीत शेतकऱ्यांना कारखान्यातील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सुचना केल्या. तेव्हा कारखान्यातील कर्मचारीही कारखान्याच्या बाहेर जाऊ लागले. इतक्यात काही पोलिस कर्मचारीही तेथे आले. त्यानंतर हळूहळू चिमणीवर चढलेले शेतकरी खाली उतरले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासन तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. `हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत. पैसे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाहीत.` अशी घोषणाबाजी केली.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.