ETV Bharat / state

पुण्यातून धूम ठोकलेले कोरोना संशयित कुटुंब अद्याप बेपत्ता

दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्यास कोरोनाची लागण झाल्याचे आठ दिवसानंतर निष्पन्न झाले. त्या कुटुंबात कळंब तालुक्यातील एक कुटुंब कामाला होते. मालकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच या कुटुंबातील सर्वांनी आपल्यालाही संसर्ग होईल, या भीतीने गुपचूप धूम ठोकली.

author img

By

Published : Mar 13, 2020, 11:57 PM IST

उस्मानाबाद - गेल्या काही दिवसांपूर्वी दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच कुटुंबात कामासाठी असलेल्या कळंब तालुक्यातील सहा जणांच्या कुटुंबाने भीतीपोटी पुणे येथून गुपचूप धूम ठोकली होती. या कुटुंबाला शोधताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. हे कुटुंब अद्याप बेपत्ता आहे.

दरम्यान, या कुटुंबाचा शोध घेत असताना उस्मानाबाद-लातूर जिल्ह्याच्या सीमेवर त्यांच्यासारखीच नावे असलेले आणखी एक कुटुंब सापडले. त्यातील सर्वांना तपासणीसाठी ताब्यात घेतले. मात्र, हे कुटुंब पुण्यातून धूम ठोकलेले कुटुंब नसून दुसरेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही हे कुटुंबही पुण्यातूनच आलेले असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्यास कोरोनाची लागण झाल्याचे आठ दिवसानंतर निष्पन्न झाले. त्या कुटुंबात कळंब तालुक्यातील एक कुटुंब कामाला होते. मालकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच या कुटुंबातील सर्वांनी आपल्यालाही संसर्ग होईल, या भीतीने गुपचूप धूम ठोकली.

हे कुटुंब कळंब परिसरात असल्याची माहिती पुणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळंबच्या उपविभागीय अधिकारी आहिल्या गठाळ यांना दिली. त्यांचा शोध घेण्यासाठी दिवसभर कळंबच्या महसूल, आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासनाची दमछाक झाली. मात्र, हे संशयित रुग्ण शोधण्यात अपयश आले. अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांना हे कुटुंबीय लातूर येथे गेल्याचे समजले. त्यानंतर या कुटुंबाला तपासणी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र, हे कुटुंब दुसरेच असल्याचे पुढे आले आहे.

प्रशासनाकडून कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचाच कसून शोध घेणे सुरू आहे. सध्या सापडलेल्या व्यक्ती लातूर तालुक्यातील गुंफावडी येथे दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आढळल्या, असे डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - अकोल्यातील चतारी गाव मूत्रपिंड विकारग्रस्त; आरोग्य यंत्रणा ठरतेय निष्फळ

हेही वाचा - दिलासादायक..! अकोल्यातील संशयित कोरोना बाधित रुग्णाचे वैद्यकीय अहवाल 'निगेटिव्ह'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.