ETV Bharat / state

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी ई-पीक पाहणी नोंदीची सक्ती नाही

पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजना
author img

By

Published : Jul 16, 2022, 10:52 AM IST

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्यात सन 2022- 23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना ( Pradhan Mantri Fasal Bima Yojana ) राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2022 आहे.

ई पिक पाहणीसाठी पिक पेऱ्याची नोंदणी 1 ऑगस्टपासून - पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणीच्या नोंदीची आवश्यकता असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक यामध्ये तफावत आढळते, अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो.

ई-पिक पाहणीमध्ये पिकाच्या नोंद दाखल्याची आवश्यकता नाही - शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पिक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पिक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पिक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पिक पाहणीमध्ये आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कृषी आयुक्तांचे प्रसिद्धी पत्रक - महाराष्ट्राचे कृषी आयुक्त यांच्या वतीने 15 जुलै रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे, की प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणीच्या नोंदीची आवश्यकता नाही. परंतु, 1 ऑगस्ट नंतर शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीमध्ये पिकाची नोंद करावी लागणार आहे.

हेही वाचा - Explanation by Uday Samant : 'जे झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता...', उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.