उस्मानाबाद - शहरात रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना अंदाजे दोनशे मेट्रिक टन गोमांस आढळले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी रात्री 9.30 वाजता नागनाथ रोड, रसुलपुरा, उस्मानाबाद येथे छापा टाकला. यावेळी त्याना हे मांस आढळुन आले आहे.
हेही वाचा- पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू
खुर्शीद पाशा शेख व त्याचे अन्य दोन साथीदार हे आयशर टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस घेऊन जात होते. यात 2,000 किलो मांस होते ज्याची अंदाजे किंमत 2,40,000 रुपये आहे. यात मांस व टेम्पो असा एकुण 7,40,000 रुपयेचा माल पोलिसांनी पकडला आहे. त्यापैकी खुर्शीद पाशा शेख याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचे अन्य दोन साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. यावरुन वरील तिन्ही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, उस्मानाबाद (शहर) येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.