ETV Bharat / state

कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन पद्धतीने यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त

author img

By

Published : Aug 17, 2020, 3:31 PM IST

लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित महिला ही उस्मानाबाद मधील स्त्री रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नऊ महिने पूर्ण होत आले होते, असे असतानाच तिला रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेचे या पूर्वी देखील एक सिझेरियन पद्धतीने डिलेव्हरी झाली होती.

कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन पद्धतीने यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन पद्धतीने यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजार पेक्षा अधिक झाली आहे. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मात्र यातही सकारात्मक बाब म्हणजे कोरोनाबाधित असलेल्या गरोदर महिलेची दुसऱ्या वेळीचे सिझेरियन प्रसूती करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं आहे. महिला आणि बाळही सुखरूप असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे.

लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित महिला ही उस्मानाबाद मधील स्त्री रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे नऊ महिने पूर्ण होत आले होते, असे असतानाच तिला रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेचे या पूर्वी देखील एक सिझेरियन पद्धतीने डिलेव्हरी झाली होती.

यावेळी या महिलेस कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच तिची प्रसूती पुन्हा एकदा सिझेरियन पद्धतीने करायची होती. कोरोना बाधित रुग्णाची अशा पद्धतीने प्रसूती करणे हे डॉक्टरांसाठी एक आव्हानच होते. मात्र यावर मार्ग काढत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या टीमने काही खासगी डॉक्टरांना सोबत घेऊन महिलेवर सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली आहे. विशेष म्हणजे या बाधित मातेचे बाळ कोरोनामुक्त असून कोरोना बाधिताची ही जिल्ह्यातीलच पहिलीच प्रसूती आहे.

सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रसूतीची सुविधा आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. पण, या रुग्णालयात सध्या शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वित नाही. त्यामुळे या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हॉस्पिटलची यंत्रणा वापरून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पथकाने ही गुंतागुंती प्रसूती यशस्वी केली

आई-बाळाची प्रकृती उत्तम..

प्रसूतीदरम्यान आईची प्रकृती बिघडी होती. दरम्यान, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पथकाने विशेष काळजी घेतली. प्रसूती होईपर्यंत डॉ. देशमुख उपस्थित होते. आता बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असून, बाळाचे वजन 2 किलो 70 ग्रॅम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.