ETV Bharat / state

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात

कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर आज अखेर कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी 300 जणांचे लसीकरण करण्यात येणार असून, लसीकरणासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
author img

By

Published : Jan 16, 2021, 5:28 PM IST

उस्मानाबाद - कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर आज अखेर कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी 300 जणांचे लसीकरण करण्यात येणार असून, लसीकरणासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात तीन केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारीच या लसी केंद्रांवर पाठवण्यात आल्या होत्या. आज प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील 9100 जणांची नोंदणी केली असून, यातील 8 हजार 272 जण आरोग्य सेवेतील आहेत. एका केंद्रावर एका दिवशी 100 जणांनाच ही लस देण्यात येणार असून, यानुसार पहिल्या दिवशी 300 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात

डॉ.सचिन देशमुख ठरले कोरोना लसीचे पहिले लाभार्थी

डॉ.सचिन देशमुख हे या कोरोना लसीचे पहिले लाभार्थी ठरले असून, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकार यांच्या हस्ते पुष्गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याला 10 हजार 50 लसी प्राप्त झाल्या आहेत. यातील 1800 लसी या शुक्रवारी जिल्हा रुग्णालय व उमरगा, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रांना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत प्रत्येक केंद्राला 600 लसी मिळाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.