ETV Bharat / state

उस्मानाबादेत कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू, जिल्ह्यातील मृतांची संख्या आठवर

परंडा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून मेडिकल रजेवर होता. या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पहाटेच्या दरम्यान सदर पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

corona positive police died
उस्मानाबादेत कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू
author img

By

Published : Jun 23, 2020, 7:21 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथून तुळजापूर तालुक्यातील माळुंब्र येथे आलेल्या 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. तर, आज परांडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे, जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

परंडा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून मेडिकल रजेवर होता. या पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पहाटेच्या दरम्यान सदर पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबादमध्ये आतापर्यंत 184 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 136 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर, आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.