उस्मानाबाद - प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील काही दिवस या संघटनेने काम बंद आंदोलन केले होते. तरी देखील मागण्या पुर्ण झाल्यानं संघाने आता उपोषण सुरू केले आहे.
वीज कंत्राटी कामगारांचा ऑक्टोबर महिन्यातील पगार ३१ डिसेंबरपूर्वी अदा करण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी कंत्राटी कामगारांना दिले होते. मात्र, जानेवारी महिन्याची १० तारीख उलटली तरी अद्यापही ऑक्टोबर महिन्याचे मानधन मिळाले नसल्याने संतप्त महावितरणच्या विरोधात या कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन सुरु केले.
हेही वाचा - 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...