उस्मानाबाद - सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तुळजापूरच्या घाटातील वळणात मळीचा कंटेनर आल्टोवर आदळली. या अपघातात कारमधील ७ जण जागीच ठार झाले तर, चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (सोमवार) सायंकाळच्या सुमारास घडला. जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तुळजापूर शहराच्या घाटातील वळणात मळीचा कंटेनर (क्रंमाक जी ०८ ए. ए. ८८८) हा सोलापूरच्या दिशेने जात होता. समोरून सोलापूरहून तुळजापूरकडे येत असलेली आल्टो (कार नं. एम एच १२ वाय. ए. ३६१४) वर पलटी झाली.
सोलापूर मार्गाने उसाची मळी घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट आल्टो कारवर आदळली. यामध्ये कारमधील ७ जण जागीच ठार तर, ४ जण जखमी झाले. त्या जखमींना पुढील उपचारासाठी उस्मानाबादच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, योगेश खटाने, अतुल यादव घटनास्थळी दाळक झाले. क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले.
या अपघातात रजनी प्रेमकुमार चिलधरे (वय ३५), शिवकुमार गोविंद पोवत्ते (वय ४०), नर्मदा शिवकुमार पोवत्ते (वय ३५), नेताजी शिवकुमार पोवत्ते (वय १२), श्रध्दा शिवकुमार पोवत्ते (वय ४), अर्पवा प्रेम कुमार चिलवरे (वय १३), वर्षा लिंबराज अडम (वय १२) असे मुत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, नागेश कॅनम (वय ३२), मयुरी नागेश कॅनम (वय २५), ऋतीका शिवकुमार पोवत्ते (वय १५), श्रावणी भालचंद्र महुत (वय ८) वर्ष असे जखमींची नावे आहेत.
