ETV Bharat / state

अतिवृष्टी नुकसान पाहणी; केंद्रीय पथक मराठवाडा दौऱ्यावर - Central team inspects aurnagabad news

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याच्या दौरा सुरु आहे. या पथकात सहा जणांचा समावेश असून सकाळी ९ वाजल्यापासून या पथकाने आपला पहाणी दौरा सुरु केला आहे.

Central team inspects Osmanabad-Aurangabad heavy rains; tour begins

author img

By

Published : Dec 21, 2020, 10:36 AM IST

Updated : Dec 21, 2020, 3:25 PM IST

औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याच्या दौरा सुरु आहे. या पथकात सहा जणांचा समावेश असून सकाळी ९ वाजल्यापासून या पथकाने आपला पहाणी दौरा सुरु केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या पथकाने सकाळी नऊच्या सुमाराला तालुक्यातील निपाणी येथून पहाणीला सुरुवात केली.

अतिवृष्टी नुकसान पाहणी; केंद्रीय पथक उस्मानाबाद-औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबादच्या नऊ गावांमध्ये पथकाची पाहणी

केंद्राच्या तीन सदस्यीय पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि औरंगाबाद तालुक्यातील नऊ गावांमध्ये पाहणी केली. पाहणी करत असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पथकाला नुकसानाबाबत माहिती दिली. अतिवृष्टीमुळे पिकांचे किती नुकसान झाले, नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळाली का? याबाबत पथकाने चर्चा केली.

हेही वाचा- सुमारे ४०० वर्षांनंतर अद्भुत खगोलीय घटनेचा योग; आज सायंकाळी पाहता येणार गुरू-शनीची युती!

हेही वाचा- कोस्टल रोडचे 17 टक्के काम पूर्ण, 7 जानेवारीला सुरू होणार पहिल्या बोगद्याचे काम; पालिका आयुक्तांची माहिती

Last Updated : Dec 21, 2020, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.