उस्मानाबाद - लाचेची तक्रार देण्यासाठी कार्यालयात जाताना तक्रारदारांना अडचणींचा सामना करावा लागतो. याला पर्याय म्हणून फोनच्या माध्यमातून तक्रार देता येणार आहे. त्यामुळे आता तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
आता एका फोनवरती तक्रार करणे सोपे झाले आहे. प्रतिबंधक विभागाने नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर केले असून कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेसाठी कामे अडवली जात असतील तर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.
खालील नंबरवरती संपर्क साधून तक्रार करता येईल
(९५२७९४३१००), निरीक्षक गौरीशंकर पाबळे (८८८८८१३७२०), निरीक्षक अशोक हुलगे
(८६५२४३३३९७) यांच्याशी थेट संपर्क करून तक्रार देता येईल किंवा ०२४७२-२२२८७९ या क्रमांकावरही तक्रार देता येईल, असे उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी सांगितले आहे.