ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी - उस्मानाबाद लेटेस्ट न्यूज

उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेत 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण 674.14 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास व पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

उस्मानाबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी

author img

By

Published : Jan 13, 2021, 10:19 PM IST

मुंबई - उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेत 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण 674.14 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास व पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय हे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.