उस्मानाबाद - 55 वी राष्ट्रीय पुरुष ( 55th National Kho Kho Tournament Osmanabad ) महिला खो-खो अजिंक्यपद ( Osmanabad Kho Kho Tournament ) स्पर्धा उद्यापासून उस्मानाबाद येथे होत आहे. देशातील 70 संघ सहभागी झाले असून,पाचदिवस चालणाऱ्या यास्पर्धेचा थरार जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे.
खेळाडूंना मिळणार पुरस्कार मिळणार - स्पर्धेच्या शेवटी एकलव्य, ( Eklavya National Award ) राणीलक्ष्मीबाई राष्ट्रीय पुरस्कार ( Ranilakshmibai National Award ) खेळाडूंना देण्यात येणार असल्याची माहिती खो-खोचे राष्ट्रीय सहसचिव चंद्रजित जाधव ( Chandrajit Jadhav National Joint Secretary of Kho Kho ) यांनी सांगितले ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्या रंगणार सामना - येथील श्रीतुळजाभवानी स्टेडियमच्या मैदानावर या राष्ट्रीय स्पर्धा उद्या 20 नोव्हेंबरपासून घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिशएनचे अध्यक्ष तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. देशभरातून क्रीडासंघटक, प्रशिक्षक, पंच निवडसमिती आणि राष्ट्रीय-राज्य असोसिएशनचे जवळपास अडीच हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा,जिल्हा सचिव प्रवीण बागल रहेमान काझी आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
देशातील पहिली स्पर्धा - पाच मैदानावर स्पर्धा खेळवल्या जाणार असून यासाठी दोन मैदान मॅटचे तयार करण्यात आले आहे. तर, तीन मातीचे मॅट तयार करण्यात आले आहेत. प्रथमच उस्मानाबाद येथे इनडोअर खो-खोचे सामने खेळवले जाणार आहेत. सर्वाधिक संघाचा सहभाग असलेली देशातील पहिली स्पर्धा असून देशाचा संघ निवडला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.