तुळजापूर (उस्मानाबाद) तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani temple tulajapur) परिसर व शहरात भीक मागणाऱ्या 18 बालभिक्षकांना (child beggars) बाल संरक्षण समितीच्या (Child Protection Committee) पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. बालकांमध्ये 15 मुले व 3 मुलींचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलांना बालसुधारगृहात ( juvenile reformatory home) पाठवण्यात आले आहे. बाल संरक्षण समितीने शुक्रवारी हे रेस्क्यू ऑपरेशन केले. आई-वडिलांची ओळख पटेपर्यंत मुलांना बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बाल संरक्षण समितीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी बाल संरक्षण समितीने शुक्रवारी हे रेस्क्यू ऑपरेशन केले. यावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ताब्यात घेतलेल्या या बालकांचे समुपदेशन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात हे ऑपरेशन राबवण्यात आले. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात एकूण 18 अल्पवयीन मुले भीक मागताना प्रशासनाच्या पथकाला आढळून आली.
15 मुलं आणि 3 मुलींचा समावेश सदरील मुलांना सांजा रोडच्या बालसुधारगृहात तर मुलींना नळदुर्गच्या आपलं घर मध्ये ठेवण्यात आले आहे. तालुका शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, तहसील प्रशासन, बाल संरक्षण समिती, चाइल्ड लाईन आदी विभागाच्या साठ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.