ETV Bharat / state

नाशकात कार झाडावर आदळल्याने उद्योजकाचा मृत्यू; १० नोव्हेंबरला होतं लग्न

येत्या १० नोव्हेंबरला अभिजितचे लग्न होते. या घटनेनंतर शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

author img

By

Published : May 29, 2019, 1:49 PM IST

Updated : May 29, 2019, 3:24 PM IST

नाशकात कार झाडावर आदळल्याने उद्योजकाचा मृत्यू

नाशिक - गंगापूर रोड परिसरात कार झाडावर आदळल्याने एका युवा उद्योजकाचा मृत्यू झाला. अभिजित शिंदे, असे या युवकाचे नाव असून ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाने अभिजितचा बळी घेतला असून हे झाड महानगरपालिकेने त्वरित काढावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

अभिजीत शिंदे हे कंपनीवरून घरी येत असताना गंगापूर रोड भागातील घराच्या २०० मीटर अंतरावरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर अभिजित यांची स्विफ्ट कार धडकली. धडक इतकी जोरात होती की अभिजित यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 14 एप्रिलला अभिजीतचा साखरपुडा झाला होता. तसेच १० नोव्हेंबरला त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्या अगोदरच काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध असलेल्या त्या झाडामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे हे झाड काढण्याची मागणी स्थनिकांनी केली आहे. एकूणच बोहल्यावर चढण्यापूर्वीच झाडाने अभिजीतचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Body:

Nashik Accident

Conclusion:
Last Updated : May 29, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.