ETV Bharat / state

नाशकात तरुणावर शस्त्राने वार, मग केली दगडाने ठेचून हत्या - जयभवानी रोड

जयभवानी रोडवरील एका मोकळ्या जागेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Feb 29, 2020, 2:51 PM IST

Updated : Feb 29, 2020, 2:57 PM IST

नाशिक- नाशिकरोड येथील जयभवानी रोडवरील एका मोकळ्या जागेत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. प्रशांत वाघ, असे मृत युवकाचे नाव आहे. टोळक्यांकडून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

नाशकात तरुणावर शस्त्राने वार, मग केली दगडाने ठेचून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील फडणवीसवाडी येथील मोकळ्या मैदानावर युवक प्रशांत वाघ याचा मृतदेह आढळून आला. यावेळी, या युवकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर त्याची ओळख पटू नये या हेतूने दगडाने त्याचा चेहरा ठेचून खून करण्यात आला आहे. या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अज्ञात आरोपी विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळ्यांकडून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा - सराफा व्यापारी विजय बिरारी यांची हत्याच.. चित्रा वाघ यांचा आरोप

Last Updated : Feb 29, 2020, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.