ETV Bharat / state

Youth Suicide Kadva River : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' तरुणाने अखेर आत्महत्या करतच संपले जीवन - पिंपळगाव बसवंत कादवा नदीत मनोरुग्णाची आत्महत्या

पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Baswant ) मध्ये नदीत उडी मारून आत्महत्या ( Suicide by jumping into river ) केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही युवकाने याच पुलाहून उडी ( Youth Suicide Kadva River ) घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शीनी या युवकाला वाचविले होते. राकेश संजय आहिरे (वय २७) ( Rakesh Sanjay Ahire ) असे आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाचे नाव आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचविताना तरुण

author img

By

Published : Apr 13, 2022, 4:49 PM IST

Updated : Apr 13, 2022, 5:01 PM IST

नाशिक - पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Baswant ) येथे मागील काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला ज्या नदीत आत्महत्या करताना वाचवले होते, तसेच दोन दिवसांपूर्वी जळत्या चितेवर झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच व्यक्तीने नदीत उडी मारून आत्महत्या ( Suicide by jumping into river ) केल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही युवकाने याच पुलाहून उडी घेत ( Youth Suicide Kadva River ) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शीनी या युवकाला वाचविले होते. राकेश संजय आहिरे (वय २७) ( Rakesh Sanjay Ahire ) असे आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाचे नाव आहे.

आत्महत्याग्रस्त तरुणाचा यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ
18 मार्च रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील कादवा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांनी त्याला वाचविले होते. त्यानंतर दि.11 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्याने अमरधाम येथे जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही मृताच्या नातलगांनी त्याला वाचवले. दरम्यान आज (बुधवारी) कादवा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पिंपळगाव बसवंत अग्निशमन दलाने या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला असता तो राकेश संजय आहिरे असल्याचे निष्पन्न झाले. दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतरही पोलिसांनी कारवाई न करत दुर्लक्ष केल्याने तिसऱ्या वेळी युवकाला आपला जीव गमवावा लागला असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Bike Accident Sangli : भरधाव डंपरच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार

Last Updated : Apr 13, 2022, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.