ETV Bharat / state

कॅन्सरग्रस्त महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी नाशिकातील तरुणींनी केले केसदान - Mrunal Baviskar Hair Donation

कॅन्सरग्रस्त महिलांना केस गेल्यामुळे नैराश्येला बळी पडावे लागते. केशविहीन समाजात कसे वावरायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. अशा महिलांना पाठबळ देण्यासाठी नाशिकच्या सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर यांनी केरळ येथील एका सामाजिक संस्थेस केसदान करून एक आदर्श घालून दिला आहे.

Nashik young women hair donation
नाशिक तरुणी केस दान
author img

By

Published : May 18, 2021, 4:29 PM IST

नाशिक - कॅन्सरग्रस्त महिलांना केस गेल्यामुळे नैराश्येला बळी पडावे लागते. केशविहीन समाजात कसे वावरायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. अशा महिलांना पाठबळ देण्यासाठी नाशिकच्या सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर यांनी केरळ येथील एका सामाजिक संस्थेस केसदान करून एक आदर्श घालून दिला आहे.

सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर

जपली सामाजिक बांधिलकी

स्रियांच्या डोक्यावरील केस त्यांच्यासाठी आभूषण असतात. केसांमुळे महिलांच्या सौंदर्यात अधिक भर पडत असते, म्हणून सर्वच स्त्रीया केसांची विशेष काळजी घेत असतात. मात्र, कॅन्सरचा सामना करताना उपचारादरम्यान अनेक महिलांना डोक्यावरील केस गमवावे लागतात. अशा वेळी अनेक महिलांना नैराश्येला बळी पडावे लागते. केशविहीन समाजात कसे वावरायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो असतो. अशा महिलांना पाठबळ देण्यासाठी नाशिकच्या सुचिता आकुल आणि मृणाल बाविस्कर यांनी केरळ येथील एका सामजिक संस्थेस केसदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

हेही वाचा - नाशिक - सिडकोत अज्ञात समाजकंटकानी सात कारच्या काचा फोडल्या

कॅन्सरग्रस्त महिलांना किमोथेरेपी नतंर केस गमवावे लागतात, डोक्याला टक्कल पडल्याने अनेक महिलांना नैराश्य येते. समाजात वावरतांना लोक काय म्हणतील, असा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. यावर उपाय म्हणून अशा महिला विगचा वापर करतात. अशा सर्व परिस्थितीचा विचार करून शहरातील देवळाली कॅम्प येथील एका बँकेत लिपिक म्हणून काम करणार्‍या सुचिता आकुल व मुकबधीर असलेल्या मृणाल बाविस्कर यांनी आपल्या डोक्यावरील केस दान केले. केरळमधील सरगक्षेत्र कल्चरल अँड चॅरिटेबल ट्रस्टला हे केस दान करण्यात आले. कॅन्सरग्रस्त महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी, तसेच महिलांमध्ये केसदान ही संकल्पना रुजविण्यासाठी या महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या पेक्षा मोठे सुख नाही

केसदान केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या कॅन्सरग्रस्त महिलांना मदत होत असेल तर त्यापेक्षा मोठे सुख नाही. याबाबत विचार केल्यानंतर केसदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबातील सदस्यांचे मोठे सहकार्य लाभले. केसदान संकल्पना वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे सुचिता आकुल यांनी सांगितले.

केरळमधील सस्था करते मोफत विगचे वाटप

विग महाग असल्यामुळे गरीब अथवा गाव खेड्यातील महिलांना ते खरेदी करणे शक्य होत नाही, यामुळे केरळमधील सरगक्षेत्र ही संस्था केसदानातून संकलित झालेल्या केसांच्या माध्यमातून गरीब महिलांना मोफत विग वाटप करते.

हेही वाचा - 'ई-पास'साठी बोगस 'आरटीपीसीआर' प्रमाणपत्र देणारे दोघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.