नाशिक : मांत्रिक महिलेने सांगितलेले सगळे उपाय करुनही काहीच लाभ व फायदा हाेत नसल्याने नैराश्यात आलेल्या भक्ताने, या तांत्रिक महिलेची हत्या केल्याचे तपासात समाेर आले आहे. जनाबाई भिवाजी बर्डे वय 45 असे महिलेचे नाव आहे. नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात जनाबाई या मजुरीचे काम करुन उदरनिर्वाह करत होत्या. याचबरोबर त्यांच्या अंगात देव येत असल्यानी माहिती अनेकांना असल्याने ते लाेक समस्या घेऊन जनाबाई यांच्याकडे येत होते. त्या समस्यांचे निराकरण करत होत्या.
नैराश्यातून केली हत्या : यात संशयित निकेश पवार हा देखील त्याची वैयक्तिक समस्या घेऊन वर्षभरापासून जनाबाईंकडे जात होता. मात्र सांगितलेले उपाय करुनही त्याला एकही लाभ झाला नाही. त्याच्या समस्येचे निराकरण झाले नाही. उलट आयुष्यात समस्या जास्त निर्माण झाल्याने याच नैराश्यातून त्याने जनाबाई बर्डे यांचा धारदार शास्त्राने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित निकेश पवार यास नाशिक रोड पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
महिलाही देवाची गादी चालवत होती : नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत शिंदे गावात हा खुनाचा प्रकार घडला असून, आरोपी निकेश पवार याला अटक केली आहे. निकेशने महिलेला मानेवर आणि शरीरावर चाकू भोकसून खून केला आहे. घटना घडली त्यावेळेस मयताची मावस बहीण रंजना माळी तिथेच होती. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. महिलाही देवाची गादी चालवत होती. अनिकेतच्या समस्येचे निराकरण झाले नाही. उलट आयुष्यात समस्या जास्त तयार झाल्याने, याच नैराश्यातून त्याने जनाबाई बर्डे यांचा धारदार शास्त्राने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- Thane Crime : पैशाच्या वादातून शिंदे गटाच्या प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- शेत जमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने खळबळ
- Shiv Sena Activist Murder : शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद