नाशिक - येवला तालुक्यातील कोळगाव ते राजापूर रस्त्यालगत कानिफनाथ डोंगराजवळ एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटनी समोर आली आहे. संतोष मोरे (वय 25 वर्षे) असे या युवकाचे नाव आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून झालेल्या युवकाजवळ कांद्याच्या रोपाचे पोते आढळून आले. त्यावरून रोपाच्या वाटणीवरून किंवा पैशाच्या कारणावरून झटापट होऊन अज्ञात व्यक्तीने संतोष मोरे या व्यक्तीचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्ती बाई घाटाजवळील वस्ती येथील रहीवाशी आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक साळवे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी भेट देत पाहणी केली.