ETV Bharat / state

अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत रिक्षा चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार - धमकी

नाशिकमध्ये एका अल्पवयीन रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 4, 2019, 8:39 PM IST

नाशिक - शहरात एका अल्पवयीन रिक्षा चालकाने मोबाईलमधील अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ३ दिवसांपूर्वीही अशीच एक घटना शहरात घडली होती.

पोलिसांनी जप्त केलेली रिक्षा

जेलरोड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन रिक्षा चालकाने २६ मार्चला कॉलेजमधून घरी जाणाऱ्या पीडित मुलीचा पाठलाग केला. तिला रिक्षात बसवून मारहाण करत बळजबरीने तिचे अर्धनग्न फोटो काढले. यानंतर त्या रिक्षा चालकाने ३० मार्चला हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडितेने नाशिक रोड पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. गुन्हात संशयिताने वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. गुण्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा राऊत करत आहेत.

तीन दिवसांपूर्वी पंचवटीतील पेठरोडवर रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या साथीने एका विवाहितेवर बलात्कार केला होता. ही घटना ताजी असतानाच, आता ही घटना समोर आल्याने रिक्षावाल्यांची गुंडगिरी आता चर्चेचा विषय ठरत आहे.

Intro:मोबाईल वरील अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन रिक्षा चालकाने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे विशेष म्हणजे रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची तीन दिवसातील शहरातील ही दुसरी घटना आहे

Body:जेलरोड परिसरात राहणारे या अल्पवयीन मुलाने 26 मार्चला कॉलेजमधून घरी जाणाऱ्या पीडित मुलीचा पाठलाग करत रिक्षात बसून युवतीला मारहाण करत बळजबरीने तिचे अर्धनग्न फोटो काढले आणि 30 मार्चला हेच फोटो व्हायरल करण्याची तिला धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित मुलीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देताच पोलिसांनी मुलावर बलात्कार आणि पाँक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे गुन्हात संशियिताने वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे या गुह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीषा राऊत करीत आहेत

Conclusion:दोन दिवसांपूर्वी पंचवटीतील पेठरोड वर रिक्षाचालकाने आपल्या मित्राच्या साथीने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना समोर आल्याने रिक्षावाल्यांची गुंडगिरी आता चर्चेचा विषय ठरत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.