नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा गोरखधंदा सुरू आहे आणि त्यात तरुणाई व्यसनाधीन (Young generation in drug craze ) झाली आहे. नाशिकची वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गांजा, एमडी ड्रग्ज, चरस आदी अंमली पदार्थांची विक्री (sale of drugs) सुरू आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष (police neglect drug sale) करत असल्याचा आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे (BJP MLA Devyani Farande) यांनी केला आहे. अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस मात्र अनभिज्ञ : नाशिक शहरातील काही ठराविक टप्प्यांवर विशिष्ट प्रकारची टकटक केली की ड्रग्ज मिळते. विशिष्ट भागात ठराविक रिक्षातून माल पुरवला जातो. पंचवटीतील एका शाळेबाहेरच महिला ड्रग्ज विक्री करते. सर्व शहरातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. लोकप्रतिनिधींपर्यंत त्या संदर्भात तक्रार येत असताना पोलिसांना हे सारे कसे माहीत नाही, असा सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दहावीचा विद्यार्थी ड्रग्जच्या आहारी : नाशिक शहरात ठीकठिकाणी अंमली पदार्थाची विक्री केली जात असून दोन दिवसांपूर्वी दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका पालकाचा आपल्याला फोन आला व त्यांनी आपला मुलगा अमली पदार्थाच्या आहारी गेल्याची तक्रार केली, असे सांगून अनेक टपऱ्यांवर ड्रग्जची खुलेआम विक्री केली जात असून इंदिरानगर- वडाळरोड वर रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत अमली पदार्थ सेवनासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण एकत्र येत असल्याच आमदार फरांदे यांनी म्हटलं.
नशेडी तरुणांची आत्महत्या : नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा गोरखधंदा सुरू आहे आणि यात अनेक तरुण,तरुणाई आहारी गेल्या आहे,अमली पदार्थाच्या सेवनातून गुन्हेगारी कारवाया वाढत असून, आत्तापर्यंत ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोप लोकप्रतिनिधी केला आहे.
ड्रग्ज ट्रॅफिकिंग अशी होते : दक्षिणेतील तेलंगणा,कर्नाटक ,आंध्र प्रदेश या राज्यातून गांजा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मार्गे नाशिक,औरंगाबाद,जळगाव, नागपूर या शहरांमध्ये येतो तर चरस हिमाचल प्रदेश,हरियाणा मधून आणले जाते, हे पदार्थ थेट मुंबई पुणे पाठवणे धोक्याचे असल्याने औरंगाबाद,नाशिक,जळगाव मार्गे त्याचे वितरण केले जाते.या गोरखधंद्यात रोज करोडो रुपयांची उलाढाल होते.
ड्रग फ्री नाशिक : तरुणाईला व्यसनमुक्त करण्याचे काम ड्रग फ्री नाशिक या मोहिमेद्वारे करण्याचे काम शहरातील ताहेरिके आशिक ए रसूल या कमिटी कडून सुरू आहे, ही मोहीम आता राज्यभरात पोहोचली आहे, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबराचे वंशज व ऑल इंडिया सुन्नी जमिआतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मोईन मिय यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात नशाविरोधात कार्यक्रम घेऊन तरुणांना व्यसनमुक्त करण्याचे कार्य सुरू केले आहेत, या मोहिमेत आतापर्यंत 16 तरुण व्यसनमुक्त झाले असून 154 तरुणांना मुंबईतील नशामुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीसाठी पाठवले आहे.