नाशिक - राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर ( Yellow Alert in 15 Districts ) केला आहे. पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. तर येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. तर नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मंगळवारी रात्री गारपीट ( Hail in Godakath area nashik ) झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोदाकाठ परिसरात गारपीट
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. सायखेडा, चांदोरी, मांजरगाव गावात झालेल्या गारपीटीमुळे द्राक्ष, गहू, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा तास चाललेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. आधीच गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरणा मुळे शेतकरी चिंतातुर झालाय. निफाड तालुक्यात झालेल्या गारपीट मुळे काढणीला आलेल्या पिके धोक्यात आली आहे.
-
पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे I Iयेत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/3gTaUvyxKm
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे I Iयेत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/3gTaUvyxKm
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 8, 2022पुढील 2 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे I Iयेत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/3gTaUvyxKm
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 8, 2022
या जिल्ह्यात येलो अलर्ट -
15 जिल्ह्यांना येलो अर्लट पुढील दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे दरम्यान, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे
मनुक्यांचे नुकसान -
मागील तीन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने नाशिक जिल्ह्यात द्राक्षाला योग्य भाव मिळाला नाही.त्यामुळे काही शेतकऱ्यांना द्राक्ष वाळून मनुके तयार केले,परंतु ते ही कमी किमतीत विकल्या गेले.बऱ्याच शेतकऱ्यांना द्राक्षाला भाव मिळाला नाही म्हणून त्यांनी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवली,अशात या वर्षी द्राक्षाला भाव मिळेल अशी आशा असतांना अवकाळी पावसामुळे त्यांच्या इच्छा वर पाणी फिरले आहे.अशात अवकाळी पावसामुळे कांदा, गहू आदी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.