नाशिक : मकरसंक्रांतीला महाराष्ट्रातील महिला देवीची पूजा करतात. संक्रांतीदेवीने या दिवशी संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात. महाराष्ट्रात या सणाचे तीन भाग असतात पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत असतो. दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. दक्षिणेतही तीन टप्प्यात हा सण साजरा केला जातो. पहिला दिवस हा इंद्राच्या नावाने साजरा केला जातो यामुळे यास इंद्र पोंगल म्हणताच. दुसरा दिवस हा सूर्याच्या नावाने साजरा केला जातो यामुळे यास सूर्य पोंगल तर तिसरा दिवस हा मनुष्याच्या नावाने साजरा केला जोता यामुळे यास मठ्ठ पोंगल, असे म्हणतात.
काय करावे : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्त्व आहे,याशिवाय या दिवशी तीळ, गुळ आणि पदार्थांचे दान कराव,या दिवशी सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ होतो. अर्थात तो उत्तर गोलार्थात येतो. सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान आणि सूर्यदेव, नवग्रह आणि देवदेवतांची पूजा, उपासना, जप, गंगा स्नान करावे, तीर्थ श्राद्ध करावे, हे वर्ष सुख, समृद्धी, आनंदी, आरोग्यदायी जावो अशी सूर्य नारायणाकडे प्रार्थना करावी हे केल्यास इतर दिवशी पेक्षा अधिक पुण्य मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी अमृतसिद्धी आणि सर्वार्थसिद्धी हे विशेष योग त्याची माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिली.
दान करावे : मकरसंक्रांतीच्या दिवशी कापूस, चादरी, लोकरीचे कपडे, गुळ, तीळ आदी थंडीच्या दिवसातील उपयुक्त वस्तू गरजूंना दान करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगूड, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते.
मकर संक्रांतीचा पौराणिक इतिहास : मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. याबद्दल इतिहासात काही पौराणिक माहिती प्राप्त होते. महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते. अर्जुन भीष्माशी लढत होता. पण अर्जुनाला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडीला पुढे उभे केले आणि त्याच्याआडं थांबून अर्जुन लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्माने आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका,आंबलीका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या. अंबेचे दुसऱ्या राजावर प्रेम होते. म्हणून भीष्माने अंबेला दुसऱ्या राजाकडे पाठविले होते. पण पळवून नेलेल्या राजकन्येचा स्वीकार करण्यास त्या राजाने नकार दिला होता. ज्या भीष्मामुळे हे सारे घडले, त्याच सूड घेण्यासाठी अंबेने ठरविले होते. त्याने कठोर तपचर्य करून शिखंडी नावाच पुरुष झाली होती. भीष्माशी लढायला आल्यावर भीष्म लढला नाही. कारण ती अगोदर स्त्री होती. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळला. त्यांचा अंगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाण घुसले होते. तो जमिनीवर न पडता बाणांवरच आडवा झाला. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरणायनचा शुभ काल सुरू होण्याची वाट पहिली आणि मगच प्राण सोडले.
हेही वाचा : Makar sankranti : मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने घालायचे आहेत ? मग फोटो पाहून बनवा 'असे' दागिने