निफाड ( नाशिक) - पिण्याच्या पाण्याकरता महिलांना नदीच्या पाण्यातून जीवघेणी कसरत ( perilous journey by water ) करण्याची वेळ निफाड तालुक्यातील ( Niphad Taluka ) नांदुर्डी गावातील महिलांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथे राहणाऱ्या महिलांनी करत आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावातील कॅनॉलच्या बाजूला जवळपास 150 ते 200 कुटुंबाची लोकवस्ती आहे. येथील महिलांना पाण्यासाठी कराबाई नदीच्या ( Karabai River ) पाण्यातून जेवघेणी कसरत करून पिण्याचे पाणी आणण्याकरता ये-जा करावी लागत लागते आहे.
हेही वाचा - एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक अडचणीत; कारागृहातील आरोपींनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची केली मागणी
पाण्यासाठी जीवघेणी कसरत.. वेळोवेळी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला सांगून देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. सध्या पावसाळा चालू असून मोठ्या प्रमाणात या नदीतून पाणी वाहत आहे. पिण्याच्या पाण्याकरता या वाहत्या पाण्यातून धडपड करण्याची वेळ येथील महिलांवर येत असून पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या वस्तीवरील रहिवासी महिला करीत आहे.
हेही वाचा - Women Fight For Water : आदित्य ठाकरेंनी तयार केलेला पुल गेला वाहून; हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवाची बाजी