ETV Bharat / state

महिला दिनानिमित्त नाशकात 'वुमन वॉकेथॉन'चे आयोजन; 'मदर अँड बेबी' थीमचे प्रमुख आकर्षण

author img

By

Published : Mar 2, 2020, 12:29 PM IST

महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, स्वतःसाठी वेळ द्यावा याबाबत जनजागृती होण्यासाठी व ठराविक चौकट मोडून महिलांनी बाहेर यावे या उद्देश दरवर्षी वुमन वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येते.

women-walkethon-held-in-nashik
महिला दिनानिमित्त 'वुमन वॉकेथॉन'चे आयोजन

नाशिक- आरोग्य संवर्धन आणि सामाजिक संदेश देण्यासाठी नाशकात आज 'वुमन वॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. यंदा प्रथमच यात 'मदर अँड बेबी' या थीमचे आयोजन होते. चिमुकल्या बाळासह माता तसेच गर्भवती महिलांनी वुमन वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केला.

हेही वाचा- 'महासत्तेची स्वप्न बघण्याचा आपल्याला अधिकार आहे काय?'

शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंब आणि नोकरी सांभाळताना अनेक महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. हे सगळे करत असताना महिलांनी स्वतःच्या आरोग्यकडे लक्ष देणे तितकच गरजेचे आहे. हाच विषय घेत सोनाली दाबक यांच्या वतीने महिला दिनानिमित्त वुमन वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केला. यात महिलांनी विविध पेहरावे करुन सहभाग घेतला होता. महिला आरोग्य, महिलांवर होणारे अत्याचार, एक गृहिणीची कुटुंब जबाबदारी, महिला सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन अशा अनेक सामाजिक विषयांवर महिलांनी यात संदेश दिला.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, स्वतःसाठी वेळ द्यावा याबाबत जनजागृती होण्यासाठी व ठराविक चौकट मोडून महिलांनी बाहेर यावे या उद्देश दरवर्षी वुमन वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येते असल्याची माहिती आयोजक सोनाली दाबक यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.