नाशिक - दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे शुक्रवारी एका १२ वर्षीय बालकावर रानडुक्कराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तन्मय संजय पेलमहाले हा मुलगा विहिरीवर गेला असता तेथे रानडुक्करांचा मोठा कळप आला. या कळपाने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर त्या बालकाला नाशिक सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या रानडुक्करांनी या आधी 2 ते 3 नागरिकांवर हल्ला केला होता. मात्र त्यांना दुखापत कमी झाली. त्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे उपचार घेऊन घरी परतले. आता रानडुक्कराच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या या बालकाच्या छातीवर दुखापत झाल्याने त्याच्यावर सध्या नाशिक सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे रानडुक्कर निळवंडी, हातनोरे पाडे परिसरात धुमाकूळ घालत आहे. दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी रानडूकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहेत