ETV Bharat / state

नाशकात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; कठोर निर्बंधासाठी भाग पाडू नका - जिल्हाधिकारी

जिल्ह्यात सध्या दोन दिवसाला जवळपास अडीच हजार रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर हा दोन टक्केवर आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. यासाठी नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. मात्र, नागरिकांकडून कारवाई करण्यास भाग पाडण्यासारखी वर्तणूक होत आहे.

corona
जिल्हाधिकारी सुरज मांढरे
author img

By

Published : Mar 12, 2021, 12:39 PM IST

Updated : Mar 13, 2021, 6:15 AM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून नागरिकांसह प्रशासनही काहीसे हादरल आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनाच्या नियमांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे नागरिकांकडून गांभीर्याने पालन केले जात नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासानला कठोर निर्बध लागू करण्यास नागरिकांनी भाग पाडू नये, असा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे

तर रविवारनंतर नाईलाजास्तव कठोर निर्बंध-

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक काही नियम पाळण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे येत्या रविवार पर्यंत रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास नाईलाजास्तव कठोर निर्बंध लागू करावे लागणार असल्यााची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

दोन दिवसात अडीच हजार रुग्ण-

शुक्रवारी नाशिककरांसाठी जिल्हाधिकारी मांढरे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने पहिल्या टप्प्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केले. त्याच पद्धतीने प्रशासनाकडूनही या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यात काहीअंशी कोरोनाच्या प्रसाराला पायबंध घालण्यास प्रशासनाला यश देखील आले. परंतु आता ज्या पद्धतीप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये हा वेग वाढत आहे हा चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल आहे.

जिल्ह्यात सध्या दोन दिवसाला जवळपास अडीच हजार रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर हा दोन टक्केवर आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. यासाठी नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. मात्र, नागरिकांकडून कारवाई करण्यास भाग पाडण्यासारखी वर्तणूक होत आहे. मात्र, प्रशासनाला कारवाई करण्यापेक्षा या महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मात्र, नागरिक जर असेच वागत राहिले तर कडक नाईलाजाने कडक पाऊले उचलावी लागतील असेही या व्हिडिओ संदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -अखेर तारीख ठरली! 21 मार्च रोजी होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा

Last Updated : Mar 13, 2021, 6:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.