लासलगाव ( नाशिक ) - निफाड तालुक्यातील लासलगावसह सोळा गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार फुटते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लासलगाव व परिसरातील सोळा गावाला भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. या भीषण पाणी टंचाईवर मात करत तहान भागवण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर कधी सामाजिक संस्था पुढे येत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत खारुताईचा वाटा उचलला आहे.
पाणी विकत घराण्याची वेळ - नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून निफाड तालुक्यातील लासलगावसह सोळा गावांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे वारंवार फुटत आहे. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने लासलगावसह 16 गावातील अंदाजे 60 ते 70 हजार नागरिकांना धरण उशाशी आणि कोरड घशाला अशी म्हण म्हणण्याची वेळ आली आहे. लासलगावात पंधरा ते वीस दिवसाला तर ग्रामीण भागात एक ते दीड महिन्याला पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना खर्च करण्याची वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने स्वखर्चातून दररोज अडीच ते तीन लाख लीटर टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु झाले आहे. पाणी भरत आपल्या घरच्यांना हातभार लावण्यासाठी लहान चिमुकल्यांची लगबग यावेळी पाहायला मिळते.
लासलगावासह 16 गावांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्याने भीषण पाणीटंचाई - नाशिक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण
लासलगावात पंधरा ते वीस दिवसाला तर ग्रामीण भागात एक ते दीड महिन्याला पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना खर्च करण्याची वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने स्वखर्चातून दररोज अडीच ते तीन लाख लीटर टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु झाले आहे. पाणी भरत आपल्या घरच्यांना हातभार लावण्यासाठी लहान चिमुकल्यांची लगबग यावेळी पाहायला मिळते.