ETV Bharat / state

नांदूरमध्यमेश्वर धरणातून 16 हजार 865 क्यूसेस पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग - नांदूरमध्यमेश्वर धरण

नाशिक जिल्ह्यात 1 ते 13 ऑगस्टदरम्यान सरासरी 612 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ 703 मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात झाला असून नाशिक तालुक्यात मागील 13 दिवसात 428 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नांदूरमध्यमेश्वर धरण
नांदूरमध्यमेश्वर धरण
author img

By

Published : Aug 14, 2020, 6:34 AM IST

नाशिक - दारणा धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून 16 हजार 865 क्यूसेस वेगाने जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणा धरण 92 टक्के भरल्याने त्यातून 5 हजार 678 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भावली धरण 100 टक्के भरले असून या धरणातूनही 701 क्यूसेस विसर्ग सुरू आहे. तसेच इगतपुरी भागात पावसाची संततधार सुरू आहे.

जिल्ह्यात 1 ते 13 ऑगस्टदरम्यान सरासरी 612 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ 703 मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात झाला असून नाशिक तालुक्यात मागील 13 दिवसात 428 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकच्या प्रमुख मोठ्या धरणातील पाणी साठा -
गंगापूर धरण 60 टक्के
करंजवण धरण 24 टक्के
दारणा धरण 92 टक्के
मुकणे 46 टक्के
कडवा 51 टक्के
चनकापूर 35 टक्के
गिरणा 50 टक्के

नाशिक जिल्ह्यात एकूण 24 लहान मोठी धरणे असून सद्यस्थितीत त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 32 हजार 684 दशलक्ष घनफुट इतका आहे, तर सर्व धरण मिळून सरासरी 51 टक्के इतका पाणीसाठा आहे.

नाशिकच्या नांदूरमध्यमेश्वर धरणातून 16 हजार 865 क्यूसेस पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.