ETV Bharat / state

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट - म्हैसमाळ

गुजरात सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावातील लोकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत फिरावे लागत आहे.

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट
author img

By

Published : May 7, 2019, 11:21 PM IST

नाशिक - राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या दुष्काळाचा फटका अनेक गावांना बसला आहे. गुजरात सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावातील लोकांनाही हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत फिरावे लागत आहे.

म्हैसमाळ गावातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट

म्हैसमाळ गावची लोकसंख्या जवळपास १ हजारच्या आसपास आहे. या गावात सध्या पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी पिण्यासाठी घोटभर पाणीही लवकर मिळत नाही. या गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. ज्या ठिकाणी पाण्याचा पाझर आहे, तेथील वाट अतिशय अवघड असून तिथे प्राण्यांची भीती आहे. मात्र, पाणी महत्त्वाचे आहे त्यामुळे मोठ्या हिम्मत करुन या ठिकाणाहून पाणी आणावे लागत, असल्याचे येथील महिला सांगतात. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते २ तास येथे बसून राहावे लागते. त्यानंतर हंडाभर पाणी मिळते तेही दुषित.

दरवर्षी लाखो रुपयांचा निधी आदिवासींच्या नावाखाली खर्च केला जातो. मात्र, त्यांच्या मूलभूत समस्या काही सोडवल्या जात नाहीत. निवडणुका आल्या की अनेक राजकीय पक्ष लोक या गावांला भेटी देतात, आश्वासन देतात. मात्र, मत घेऊन झाली की कोणीही यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आता तरी आदिवासी भागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Intro:राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे अनेक गावांना या भीषण दुष्काळाचा फटका बसलाय...

Body:गुजरात सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल हे छोटेस म्हैसमाळ गाव असुन गावाची लोकसंख्या हजाराच्या जवळपास आहे मात्र या ठिकाणी पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे पिण्यासाठी घोटभर पाणी लवकर या गावात मिळत नही

Conclusion:या हंडाभर पाण्यासाठी दररोज मोठी कसरत ह्या महिलांना करावी लागते ज्या ठिकाणी पाण्याचा पाझर आहे तेथील वाट अतिशय अवघड असून त्यात प्राण्यांची भीती मात्र पाणी हेच महत्त्वाचं आहे त्यामुळे भीती वाटत नाही असे या महिलांनी सांगताना पुरुष मंडळी ही महिलांना आधार म्हणून येत असतात महिलांना हंडाभर पाण्यासाठी दीड ते दोन तास बसून राहावं लागतं तेव्हा कुठेतरी हंडाभर पाणी मिळते तेही गढुळच असतं मग हे पाणी घरी न्यायचं गाळुन घायच व त्यात असलेली माती तळाला जाई पर्यत वाट बघायची आणि मग प्यायचं असा आमच्या महिलांचा दररोजचा दिनक्रम असल्याच मैसमाळ येथील महिलानी सागितले...
दरवर्षी लाखो रुपयांचा निधी आदिवासींच्या नावाखाली खर्च केला जातो मात्र त्याच्या मूलभूत समस्या काही सोडवल्या जात नाही निवडणुका आल्या की अनेक राजकीय पक्ष लोक या गावाला भेटी देतात आश्वासन देतात मात्र मत घेऊन झाली की कोणीही यांच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे मायबाप सरकारने या आदिवासी भागाकडे आता तरी लक्ष देण्याची गरज आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.