नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. यावेळी 17 लाखांपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
LIVE UPDATE -
- सायंकाळी 6 वाजेपर्यंत 64.24 टक्के मतदान
- सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.20 टक्के मतदान
- दुपारी 3 वाजेपर्यंत - 46.13 टक्के मतदान
- 3 वाजता - दुपारी 2 वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात 35.23 टक्के मतदान
- 01.50 वाजता - दुपारी 1 वाजेपर्यंत दिंडोरी मतदारसंघात 33.65 टक्के मतदान
- 12.21 वाजता - आतापर्यंत 21.06 टक्के मतदान
- सकाळी 9 वाजता - पहिल्या दोन तासात दिंडोरी मतदारसंघात 7.28 टक्के मतदान
- सकाळी 7 वाजता - मतदानाला सुरुवात
दिंडोरी मतदारसंघात 17 लाख 28 हजार 978 मतदार आहेत. त्यापैकी 9 लाख 1 हजार 252 पुरुष, तर 8 लाख 27 हजार 715 महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार 11 आहेत. 4 हजारांपेक्षा जास्त मतदार केंद्रांवर हे मतदान पार पडेल. यासाठी 20 हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. दिंडोरीमध्ये भाजपकडून भारती पवार, राष्ट्रवादीकडून धनराज महाले तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जीवा पांडू गावीत रिंगणात आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 15 संवेदनशील मतदान केंद्र असून त्यामध्ये मनमाड,नांदगाव, कळवण, येवला, दिंडोरी या तालुक्यांचा समावेश आहे