नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज आहे. नाशिक मतदारसंघातही आज सकाळी 7.00 वाजता सुरुवात झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ उमेदवार असले तरी खरी लढत महायुतीच्या हेमंत गोडसेंविरुध्द महाआघाडीचे समीर भुजबळ यांच्यात असल्याचे मानले जाते. मात्र, भाजपमधून बाहेर पडलेले अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हेही या निवडणुकीत निर्णायक ठरतील.
Live Updates -
- ६.०० - सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक मतदार संघात ५५.४१ टक्के मतदान झाले.
- ३.०० - दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक मतदार संघात ४१.७२ टक्के मतदान
- 03.00 pm - मराठी अभिनेत्री मृणाल दुसाणीस यांनी बजावला मतदानाचा अधिकार.
- 02.00 pm - नाशिक मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत २७.१५ टक्के मतदान.
- 01.20 pm - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क.
- 11.20 am - नाशिक मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान
- 10.50 am - भुजबळ कुटुंबीय मतदानासाठी मतदानकेंद्रावर हजर.समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीत नसल्याने संतप्त. ठरवून नाव गायब केल्याचा भुजबळांचा आरोप
- 09.10 am - नाशिक लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६९ टक्के मतदान
- 09.00 am - महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी बजावला मतदानाचा हक्क.
- 08.00 am - काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याने सकाळी उत्साहात मतदान करण्यास आलेल्या मतदारांचा हिरमोड
- 07.00 am - नाशिक मतदारसंघात मतदानाला सुरुवात.