ETV Bharat / state

तक्रारदाराला ठाण्यात मिळणार चांगली वागणूक; नांगरे पाटलांचा पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय - Complainant

पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी तक्रारदाराला पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीची माहिती नियंत्रण कक्षामार्फत एका स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून खातरजमा केली जाणार आहे. यात तक्रारदाराला फोन करुन काही प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील दिली.

विश्वास नांगरे पाटील
author img

By

Published : Jul 6, 2019, 6:00 PM IST

नाशिक - पोलीस ठाण्यात तक्रारदाराला कशी वागणूक मिळते, याची माहिती नियंत्रण कक्ष तक्रारदाराकडून घेणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात पोलिसांना आता तक्रारदाराशी सौजन्याने वागावे लागणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विश्वास नांगरे पाटील

साहेब माझी एक तक्रार आहे. असे म्हटले तरी त्या तक्रारदाराला पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार केला जातो. त्यामुळे तक्रारदाराला आपणच गुन्हेगार आहे की काय, अशी भावना होते. यामुळे अन्याय होऊन सुद्धा अनेक जण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढत नाहीत. तसेच काही वेळा पोलीस तक्रारदाराकडून गुन्हा नोंद करण्यासाठी चिरीमिरीची मागणी करतात. आता हे सर्व थांबवण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

तक्रारदाराला पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीची माहिती नियंत्रण कक्षामार्फत एका स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून खातरजमा केली जाणार आहे. यात तक्रारदाराला फोन करुन काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याला पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराकडून कशी वागणूक मिळाली? तक्रारदाराचे म्हणणे व्यवस्थित एकूण घेतले का? तक्रारी नुसार गुन्हा नोंद केला का? गुन्हा नोंद केल्याची एफआयआर कॉपी विनामूल्य दिली का? तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी काही मागणी केली का? ही सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे लाचखोरीला आळा बसणार आहे. याशिवाय घटनास्थळावर पाहणीसाठी जाणे हे कर्तव्य असतानाही तसे न करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर या माध्यमातून वचक निर्माण केला जाणार आहे. तसेच चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.

Intro:पोलीसदादा आता तक्रारदाराशी चक्क सौजन्याने वागणार...

Body:नाशिकच्या पोलीस ठाण्यात आता चक्क पोलीसदादा तक्रारदाराशी सौजन्याने वागणार आहे..पोलीस ठाण्यात तक्रारदाराला कशी वागवून मिळाली ह्याची माहिती नियंत्रण कक्ष
तक्रारदारा कडूनच घेणार आहे...पोलीस आयुक्तांनी विश्वास नांगरे पाटील ह्यानी घेतलेल्या ह्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे...

साहेब माझी एक तक्रार आहे....असं म्हटलं तरी त्या तक्रारदाला पोलिसांन कडून प्रश्नाचा इतका भडीमार मार केला जातो,की आपणच गुन्हेगार आहे की काय ,अशी त्यांची भावना होते,ह्यांमुळे अन्याय होऊन सुद्धा अनेक जण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासाठी धजवत नाही,एवढंच नाही तर अन्याय ,अत्याचार झालेल्या तक्रारदारा कडूनच गुन्हा नोंद करण्यासाठी अनेकदा चिरीमिरी मागणी केली जाते,आता हे सर्व थांबवण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा बद्दलण्या साठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ह्यांनी पुढाकार घेतला आहे,तक्रारदाराला पोलीस ठाण्यात मिळालेली वागणूक ह्याची नियंत्रण कक्षा मार्फत एका स्वतंत्र अधिकाऱ्यां मार्फत खातरजमा केली जाणार आहे...ह्यात तक्रारदाराला फोन करून काही प्रश्न विचारले जाणार आहे,ह्यात पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कडून कशी वागणूक मिळाली?,तक्रारदाराचे म्हणणं व्यवस्थित एकूण घेतले का? तक्रारी नुसार गुन्हा नोंद केला का?
गुन्हा नोंद केल्याची एफआयआर कॉपी विनामूल्य दिली का?तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडे काही मागणी केली का याचाही अंदाज पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे ...

या माध्यमातून लाचखोर सारख्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न विश्वास नागरे पाटील यांनी केला आहे, याशिवाय घटनास्थळावर पाहणीसाठी जाणे हे कर्तव्य असतांनाही तसे नं करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर या माध्यमातून वचक निर्माण केला जाणार आहे..तसेच चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान ही केला जाणार असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं..
बाईट विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त नाशिक..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.