येवला ( नाशिक ) - निफाड तालुक्यातील विंचूर उपबाजार आवारामध्ये झालेल्या कांदा लिलावामध्ये येवला तालुक्यातील देशमाने येथील सुनील दुगड या शेतकऱ्यांच्या गोल्टी कांद्याला फक्त 51 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 5 पैसे किलो बाजार भाव मिळाला. यामुळे शेतकर्यांनी नाराज होत कांदा न विकता घरी घेऊन जाणे पसंत केले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांद्याला कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात सध्या कांद्याने पाणी आणले आहे .
5 पैशे किलो भाव - या शेतकऱ्याने 20 क्विंटल कांदा लिलाव साठी आणला होता. परंतु प्रतवारी योग्य नसल्याने केवळ 51 रुपये प्रतिक्विंटल भाव म्हणजे 5 पैशे किलो भाव मिळाला त्यामुळे हा कांदा घरी घेऊन जाणे शेतकऱ्याने पसंद केले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी कोणाला पडणार नाही अशी प्रतिक्रिया सुनील दूगड या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे.