ETV Bharat / state

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ टाकल्याचे उघड; तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल - त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी सुशांत तुंगार

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा पुजाऱ्यांनी दावा केला होता. मात्र मंदिर देवस्थानाच्या अध्यक्षांनीच संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी दरम्यान पुजाऱ्यांनीच पिंडीवर बर्फ आणून ठेऊन बनाव केल्याचे उघड झाले. त्यानंतर पुजाऱ्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ टाकल्याचे उघड
author img

By

Published : Feb 9, 2023, 11:43 AM IST

प्रतिक्रिया देताना कृष्णा चांदगुडे अंनिस पदाधिकारी

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल झाला होता. याबाबत पोलीस तपासात एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचे आढळून आला आहे. तात्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला होता.

तीन पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल : देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याच्या निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. त्यानंतर नेमलेल्या चौकशी समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. समितीच्या अहवालानंतर तात्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तीन पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुजाऱ्यांनी भाविकांच्या भावनेशी खेळ खेळला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय होता प्रकार : त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी सुशांत तुंगार यांनी स्वतः पिशवीत बर्फ नेऊन ते पिंडीवर ठेवला होता. त्यावर बेल पत्र ठेवून त्याचे व्हिडिओ काढून ते व्हायरल केले. यात त्यांना आकाश आणि उल्हास तुंगार यांनी मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 505 (3) 417 आणि 120 (ब) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनाव उघड : 30 जून 2022 रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील शिवपिंडीवरती बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. याबाबत पुजाऱ्यांनी ईशान्य भारतावर अतिक्रमण झाले तर अशाच प्रकारचा बर्फ जमा होण्याच्या दावा केला होता. मात्र हा बनाव असल्याच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले होते. याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. आता बनाव असल्याचे उघड झाला आहे. या संदर्भात तीन पुजाऱ्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आम्ही प्रशासनाचे अभिनंदन करतो, मात्र या प्रकरणाला उजेडात येण्यासाठी वेळ का लागला? असाही प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे.

हेही वाचा : Sankashti Chaturthi 2023 : जाणून घ्या फेब्रुवारी महिन्यात कधी आहे 'संकष्ट चतुर्थी', वर्षे 2023 मधील संपूर्ण यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.