नाशिक - शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सटाणा, बागलाण आदी भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. तर काही भागात इगतपुरी आणि सटाणा भागात गारपीट देखील झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यातील काही भागात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. तसेच सुरवातीला त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाला सुरवात झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील साकुर आणि बागलाण भागात गारपीट देखील झाली. तसेच सटाणा तालुक्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत होता. सकाळी 12 ते 14 अंश सेल्सियस तापमान असून दुपारी उकाडा जाणवत होता. हवामान खात्याने देखील पावसाचा इशारा दिला होता.शेतकरी वर्ग चिंतेतनाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, मका आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात अजूनही पाऊस सुरू असून शासनाने पंचनामे केल्यानंतर किती हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे हे समोर येणार आहे. हेही वाचा - अभिनेत्यांबद्दल बोललं की आपसूकच प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोले यांना टोला