ETV Bharat / state

पुढच्या जन्मात अशी बायको नको ! पत्नीपीडित पुरूषांचे नाशकात अनोखे आंदोलन - नाशिकमध्ये मुंडन आंदोलन

या आंदोलनामध्ये वयस्कर तर काही चाळिशीतले लोक आले होते. या मंडळीनी यावेळी आपल्याच पत्नीचा निषेध केला. पत्नीपीडित आणि महिला संरक्षण कायदा पीडित मंडळींनी आपल्याच पत्नीच्या नात्याचे पिंडदान केले.

पत्नीपीडित पुरूषांचे नाशिमध्ये अनोखे आंदोलन
author img

By

Published : Sep 22, 2019, 8:46 PM IST

नाशिक - तुम्ही अनेक प्रकारची आंदोलने पाहिली असतील. तसेच आंदोलनाची विविध कारणेही तुम्ही पाहिली असतील. मात्र, नाशिकमध्ये राज्यातील तमाम पुरुषांनी एक आगळे-वेगळे आणि धक्कादायक आंदोलन केले आहे. राज्यातील पत्नीपीडित पुरुषांनी रामकुंडावर चक्क मुंडन आणि पिंडदान करत आंदोलन केले. 'वास्तव' फाउंडेशनच्या माध्यमातून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

पत्नीपीडित पुरूषांचे नाशकात अनोखे आंदोलन

हेही वाचा - ठरलं.. 'मनसे' ही विधानसभेच्या रिंगणात, नाशिकमधील सर्व जागा लढवणार

या आंदोलनामध्ये वयस्कर तर काही चाळिशीतले लोक आले होते. या मंडळीनी यावेळी आपल्याच पत्नीचा निषेध केला. पत्नीपीडित आणि महिला संरक्षण कायदा पीडित मंडळींनी आपल्याच पत्नीच्या नात्याचे पिंडदान केले. पत्नीपासून होणाऱ्या सर्व त्रासाची आहुती देऊन मुंडन केले. तसेच आमच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी केंद्रीय पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी, अशी मागणी या संघटनेने केली.

देशात प्रचलीत असलेल्या सर्व कायद्यांचे फक्त महिलांना संरक्षण असल्याचा आरोप या पुरुषांनी केला. पुरुषांसाठी एकही कायदा नसल्याचे या पुरुषांचे म्हणणे आहे. यातील अनेकांवर त्यांच्या पत्नीने खोट्या केसेस केल्या असल्याचा दावा केला आहे. कायद्याचा धाक दाखवून महिला, पुरुषांवर प्रचंड अत्याचार करतात, असा आरोप या पुरुषांनी केला.

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

तर या पुरुषांनी केलेल्या पिंडदानाला काहीही महत्व नाही. धार्मिक परंपरेत जीवंत माणसाचे पिंडदान करता येत नाही, हे संतापाच्या भरात केलेले पिंडदान आहे, असे येथील पुरोहित सांगतात. त्यामुळे आता या पुरुषांनी केलेल्या पिंडदानामुळे खरेच पत्नीपासून त्यांना मुक्ती मिळेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:श्री क्षेत्र नाशिकच्या रामकुंडावर आज एक अनोखं आंदोलन झालं.आज राज्यातील पत्नी पडित अनेक पुरुष रामकुंडावर जमले होते त्यानी चक्क मुंडन आणि पिंडदान करत अदोलन केले
वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून हे अनोख आंदोलन केलय. Body:श्री क्षेत्र नाशिकच्या या रामकुंडावर आज राज्यातील अनेक पुरुष एकत्रित जमले होते..ते चक्क मुंडन आणि पिंडदान करण्यासाठी...हातात गुलाबाचं फुल घेऊन उभे राहिलेले हे तरुण पहा..यातील काही जण वयस्कर आहेत तर काही जण अगदी चाळिशीतल्या आतले आहेत..मात्र ही सारी मंडळी कोणाच्या स्वागतासाठी नाही तर चक्क आपल्याच पत्नीच्या निषेधार्थ उभी आहे...पत्नीपीडीत आणी महिला संरक्षण कायदा पीडित...ही मंडळी आहे...आज यांनी आपल्या पत्नीच्या नात्यांच पिंडदान केलंय.. पत्नीपासून होणाऱ्या सर्व त्रासाची आहुती देऊन मुंडन केलं आहे तसेच आमच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी केंद्रीय पुरुष आयोगाची निर्मिती व्हावी अशी मागणी या संघटनांकडून होतीये

बाईट : 1) अमित पांडे ( वास्तव फाउंडेशन सदस्य)

Conclusion:देशात प्रचलीत असलेल्या सर्व कायद्यांचं फक्त महिलांना संरक्षण असल्याचा आरोप या पुरुषांनी केलाय.पुरुषांसाठी एकही कायदा नसल्याचंही या पुरुषांचं म्हणणं आहे.यातील अनेकांवर त्यांच्या पत्नीनं खोट्या केसेस केल्या असल्याचा दावा केलाय.कायद्याचा धाक दाखवून महिला,पुरुषांवर प्रचंड अत्याचार करताय असा आरोप हे पुरुष करताय

बाईट -2) सुनील कोकणे (पत्नीपीडित)
3)ऍड धर्मेंद्र चव्हाण ( पुरुष हक्क समिती अध्यक्ष)

मात्र या पुरुषांनी केलेल्या पिंडदानाला काहीही महत्व नाही..धार्मिक परंपरेत जिवंत माणसाचं पिंडदान करता येत नाही हे संतापाच्या भरात केलेलं पिंडदान आहे असं येथील पुरोहित सांगतात..

बाईट : 4)सतीश शुक्ल (नाशिक पुरोहित संघ अध्यक्ष)

त्यामुळे आता या पुरुषांनी केलेल्या पिंडदानामुळे खरच पत्नीपासून त्यांना मुक्ती मिळेल का..की पुन्हा एकदा कायदेशीर बाबी समोर ठेवूनच आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागेल..हेच बघन महत्वाचं ठरणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.