नाशिक- आतापर्यंत आपण हजार, दीड हजार रुपयांपर्यंत एक किलो मिठाई घेतली असेल. मात्र तब्बल ९ हजार रुपये प्रति किलो दराची मिठाई आता बाजारात दाखल झाली आहे. नाशिकच्या सागर स्वीट येथे गोल्डन मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही मिठाई उपलब्ध करून देण्यात आली असून तिला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पेढे, बिस्कीट अशा विविध प्रकारात सोन्याची मिठाई उपलब्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या महागाची मिठाई बाजारात आल्याने शहरात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. या मिठाईत २६ कॅरेट सोन्याच्या समावेश असून त्याची चव देखील चांगली आहे.