नाशिक - शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीकविमा योजनेसंदर्भात सुसंवाद साधण्यासाठी नांदगाव येथे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नांदगाव मतदारसंघात आमदार शिवसेनेचाच असणार, असे सूचक वक्तव्य केले. तसेच पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना फसवाल तर तुमची दुकानदारी बंद करू, असा इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या पंधरा दिवसात पीक विमा योजनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर विमा कंपन्यांची दुकानं बंद करणार. पीक विमा योजना काही दलालांनी खाल्ली आहे. प्रत्येक तालुक्यात एक तरी शेतकरी मदत केंद्र सुरू करणार आहे. आमचं युतीचं जमलंय आणि शिवसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवते. यावेळी संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुहास कांदे, सुभाष कुटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बी-बियाणे व फवारणी पंप मोफत वाटण्यात आले. या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार होणार - उद्धव ठाकरे - Nandgaon assembly constituency
शेतकऱ्यांची कर्जमाफी व पिकविमा योजनेसंदर्भात सुसंवाद साधण्यासाठी नांदगाव येथे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित केला होता.
नाशिक - शेतकऱ्यांची कर्जमाफी व पीकविमा योजनेसंदर्भात सुसंवाद साधण्यासाठी नांदगाव येथे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नांदगाव मतदारसंघात आमदार शिवसेनेचाच असणार, असे सूचक वक्तव्य केले. तसेच पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना फसवाल तर तुमची दुकानदारी बंद करू, असा इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या पंधरा दिवसात पीक विमा योजनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर विमा कंपन्यांची दुकानं बंद करणार. पीक विमा योजना काही दलालांनी खाल्ली आहे. प्रत्येक तालुक्यात एक तरी शेतकरी मदत केंद्र सुरू करणार आहे. आमचं युतीचं जमलंय आणि शिवसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवते. यावेळी संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुहास कांदे, सुभाष कुटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बी-बियाणे व फवारणी पंप मोफत वाटण्यात आले. या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Body:येत्या पंधरा दिवसात पिक विमा योजनचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नाही पोहोचल्यास विमा कंपन्यांचे दुकान बंद करणार पिक विमा योजना काही दलालांनी खाल्ल्या असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय प्रत्येक तालुक्यात एक तरी शेतकरी मदत केंद्र सुरु करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आमचं युतीच जमलंय आणि शिवसेना सत्तेत राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत असे त्यांनी सांगितले यावेळी सजय राऊत एकनाथ शिंदे, सुहास कांदे ,सुभाष कुटे आदींनी मनोगत व्यक्त केलय
Conclusion:यावेळी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बी-बियाणे व फवारणी पंप मोफत वाटण्यात आलय या मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी व हजारो संख्येने शेतकरी उपस्थित होते