ETV Bharat / state

शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक; भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई

author img

By

Published : Aug 10, 2021, 5:14 PM IST

सध्या नाशिक शहरामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळतात शहरातील विविध ठिकाणांहून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना समोर येत असल्याने वाहन धारकांना मध्ये भीतीचं वातावरण पसरलेले असताना भद्रकाली पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला गजाआड केले आहे.

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक
दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

नाशिक - नाशिक शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या जक्की अख्तार शेख याला भद्रकाली पोलिसांनी तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.

शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

आठ दुचाकी मोटारसायकल चोरल्याची कबुली

सध्या नाशिक शहरामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळतात शहरातील विविध ठिकाणांहून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना समोर येत असल्याने वाहन धारकांना मध्ये भीतीचं वातावरण पसरलेले असताना भद्रकाली पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला गजाआड केले आहे. जाक्कोर उर्फ जक्की अख्तार शेख असे या चोरट्याचे नाव असून त्याला द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस भागातून भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांनी संशयिताची विचारपूस करताच त्याने शहरातील विविध भागातून आठ दुचाकी मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे.

3 लाख रुपयांच्या मोटरसायकल हस्तगत

जक्कोर उर्फ जक्की अख्तार शेख भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात विविध ठिकाणांहुन जाक्कोर याने चोरलेल्या जवळपास तीन लाख रुपयांच्या आठ दुचाकी गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून या संशयितांवर भद्रकाली आणि गंगापूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी पुढील कारवाई भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या या चोरट्याला पोलिसांनी अटक केल्याने भद्रकाली पोलिसांच्या कारवाईच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.